Search for:
Heart Patient

“माझी कार्डियाक सर्जरी यशस्वी केल्याबद्दल डॉ. दीपी अग्रवाल गोयल आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. त्यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे आणि आश्वासक स्वभावामुळे माझी भीती दूर झाली. मी आता पूर्णपणे बरा असून माझे आयुष्य आनंदाने जगत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचा मला अभिमान आहे!”
“हृदयाच्या शस्त्रक्रियेचे नाव ऐकले की मनात खूप भीती निर्माण होते, पण डॉ. दीपी यांच्याकडे आल्यावर मला खूप धीर मिळाला. त्यांनी मला शस्त्रक्रियेबद्दल सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगितली. आज शस्त्रक्रियेनंतर माझी तब्येत खूप छान आहे. जर तुम्हालाही अशी काही अडचण असेल, तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
डॉ. दीपी अग्रवाल यांनी केवळ माझी शस्त्रक्रियाच केली नाही, तर मला मानसिक आधारही दिला. त्यांच्या प्रोफेशनल ट्रीटमेंटमुळे मी आज निरोगी आहे. हृदयविकाराच्या बाबतीत भीती न बाळगता वेळेवर उपचार घेणे किती महत्त्वाचे आहे, हे मला आता उमजले आहे.
डॉक्टर दीपी, तुमच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद!”🙏

राजेंद्र विठ्ठल कुचेकर

नमस्कार 🙏
मी राजेंद्र विठ्ठल कुचेकर बोलत आहे.

मला हृदयाशी संबंधित त्रास होत होता आणि मी खूप चिंतेत होतो. अशा वेळी मी माझी Cardiac Surgery डॉ. Deepi Agrawal Goyal यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सुरुवातीला खूप भीती वाटत होती, पण डॉक्टर आणि त्यांच्या टीमने मला धीर दिला आणि प्रत्येक टप्प्यावर साथ दिली.
ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले आणि आज मी पूर्वीपेक्षा खूप चांगला आहे.
डॉ. Deepi Agrawal Goyal यांचे मनापासून आभार.

ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी भीती न बाळगता योग्य वेळी उपचार घ्यावेत, अशी माझी विनंती आहे.
धन्यवाद 🙏

बुवासाहेब ढोणे

नमस्कार 🙏

माझ्या वडिलांची (बुवासाहेब ढोणे) cardiac surgery मी सूर्या सह्याद्री हॉस्पिटल Dr Deepi Agrawal यांच्या कडून मध्ये केली आहे .ऑपरेशन साठी मॅडम चे नाव मला माझ्या बहिणीने सुचवले होते. तिला मॅडम चा छान अनुभव होता त्या मुळे मी सुद्धा मी माझ्या वडिलाचे ऑपरेशन मॅडम कडून केले . आणि खरोखरच मॅडम चा अनुभव खूप छान आहे .मॅडमनी अत्यंत चागल्या पद्धतीने surgery केली. त्याच बरोबर पेशंटला आणि मला mentaly सपोर्ट केला. चांगल्या प्रकारे काळजी घेतली . ऑपरेशन नंतर रूटीन check-up कधी करायचे , काय काळजी घ्यायची , सर्व वैयक्तिक लक्ष देतात.
मॅडम खूप खूप आभारी आहे 🙏